१४ एप्रिलला अवघ्या अाठवडभराचा कालावधी शिल्लक आहे. दरवर्षी १४ एप्रीलला संपूर्ण देशभरात मोठ्या ऊत्साहात आंबेडजर जयंती साजरी केली जाते. गेल्या वर्षी मात्र जयंतीवर कोरोनाचे सावट होते. यंदाही गेल्या वर्षीसारखीच स्थिती आहे. परिणामी वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमिवर अनुयायांना अावाहन केले आहे.
राज्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढताच आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये रात्रीची संचारबंदी आणि सकाळी जमावबंदी असणार आहे. ३० एप्रीलपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. यादरम्यानच आंबेडकर जयंती आली आहे.
आंबेडकर जयंतीबाबतसुद्धा सरकारकडून काही नियमावली जाहीर केली जाणार आहे. लॉकडाऊन लावावा किंवा नाही हा वेगळा विषय आहे. मात्र सरकारने जयंतीच्या पार्श्वभूमिवर केलेल्या नियमांचे सर्वांना पालन करायचे आहे. असे आवाहन प्रकाश आंबेडजर यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. व्याख्याने, सांस्कृतीक कार्यक्रमे यांचा समावेश असतो. मात्र गेल्या वर्षीसुद्धा कोरोना संक्रमणाचा वेग अधिक असल्यामुळे जयंतीवर निर्बंध आले होते. यावर्षिदेखील तीच स्थिती आहे.