राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍यावर काय म्हणाले प्रविण दरेकर

12

राज ठाकरे य‍ांनी आयोध्या दौरा करणार असल्याचे जारी केले. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमिवरच भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी एका खाजगी वृत्तवाहिणीशी बोलतांना आपले मत मांडले आहे. हिंदुत्व ही राज ठाकरेंची याआगोदरसुद्धा भूमिका राहिलेली आहे. शिवसेनेत असतानाही राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिकेचे आग्रही होते. आता जर ते अयोध्येत जात आहे तर त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल. अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मांडली आहे.

पुढील वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली आहे. सेना कॉंग्रेससोबत गेली असल्यामुळे सेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ऊपस्थित केले जात आहे. अशांत मनसे ही पोकळी भरुन काढण्याचे काम करीत आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा यामध्ये भर घालाणारा आहे. या पृष्ठभूमीवर मनसे-भाजप युतीच्या चर्चासुद्धा रंगत आहे.

मनसे-भाजप युती यांवर प्रविण दरेकर यांना विचारले असता, “युती ही समविचारी घटकांची होत असतो. वैचारिक विचारधारावर होत असते किंवा तशाप्रकारचे वातावरण असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशाप्रकारचे काही वातावरण आले तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष व संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल, असे मला वाटते” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.