मनसुख हिरेन प्रकरणी काय म्हणाले संजय राऊत? क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझेंनीसुद्धा दिली प्रतिक्रिया

9

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा काल मृत्यु झाला आहे. मुंब्रा परिसरातील खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या गाडीमध्ये एक धमकीचा ईशारा देणारी चिठ्ठी आढळली होती आणि एका दहशतवादी संघटनेने त्याची जवाबदारीसुद्धा घेतली होती. काल मनसुख हिरेन यांच्या अचानक झालेल्या मृत्युने प्रकरणातील गुढ चांगलेच वाढवले आहे. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगीतले आहे. मात्र कुटुंबियांनी आत्महत्येच्या दाव्यास स्पष्ट नकार दिला आहे.

याप्रकरणी काल विरोधकांनी सभागृहात हा विषय मांडला होता. शिवसेना प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यामांशी बोलत होते. मनसुख हिरेन यांचा मृत्यु दुर्दैवी आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. तसेच त्यांची हत्या की आत्महत्या ही शंका ऊपस्थित झाली आहे. परंतू लवकरच या शंकेचे निरसन होईल. या सगळ्या प्रकरणातील सत्य लवकरांत लवकर समोर अाणने हा सरकारच्या प्रतिष्ठेच्या विषय आहे. विरोधकांनी यामध्ये थोडा संयम वाळगणे जरुरी आहे. सरकारला आरोपीच्या पिंजरात ऊभे करणे चुकीचे ठरेल. असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकणी विविध प्रश्न ऊपस्थित करत सचिन वाझे हे घटनास्थळी सर्वप्रथम कसे पोहचले? असा सवाल केला आहे. तसेच सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचा दावासुद्धा फडणवीस यांनी केला अाहे.

सचिन वाझे यांनी यावर भूमिका स्पष्ट करत, माझ्याअगोदर त्याठिकाणी अनेक यंत्रणा पोहचल्या होत्या असे ते यावेळी म्हणाले. गावदेवीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक, डीसीपी झोन-2 आणि बीडीडीएस पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रांचचं युनिट पोहोचलं होतं असे वाझे यांनी सांगीतले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास एटीएसकडे सोपवला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी अनेक संशयास्पद बाबी पुढे येत आहेत. त्यामुळे संबंद्धिच प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे.