पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक आरोग्य तज्ज्ञ, लॅबमधील तंत्रज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यावरून काँग्रेस नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार, असा थेट सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
कोरोनाबाबत केंद्राने वेळीच नेमकी काय उपाययोजना केली, यावर पत्रकार परिषद कधी घेणार? देशाला उत्तरे कधी मिळणार?, अशी विचारणा अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून केली आहे.