एक ग्रामपंचायत गेली म्हणून काय झालं; ‘यांनी’ केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण

76

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश मिळालं असल्याचं दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांत केला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याला सर्वाधिक यश मिळाल्याचा दावा केला आहे. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये जवळपास सर्वच प्रस्थापित नेत्यांनी आपापले गड कायम राखले.

मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे. खानापूरात शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली होती.

दरम्यान, भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली आहे. ‘एक ग्रामपंचायत गेली म्हणून काही होत नाही, इतर ठिकाणी चंद्रकांत पाटलांचं काम भक्कम आहे, टीका करणारे करत राहतात. चंद्रकांत पाटलांचं काम चांगलं आहे.’ असं नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.