संजय राठोड यांच्या राजिनाम्याअगोदर काय घडले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी?

30

पुजा चव्हान प्रकरणात नाव पुढे आलेले महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेनेचे आ.संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सपत्नीक पोहचून राजिनामा दिला आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी राजिनामा स्विकारल्याची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. राजिनामा स्विकारण्यअगोदर वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांच्या ऊपस्थिती बैठक झाली. ही बैठक तब्बल एक तास चालली आणि त्यानंतर संजय राठोड यांनी राजिनामा दिला आहे.

संजय राठोड यांचा राजिनामा स्विकारण्यावरुन शिवसेनेतसुद्धा दोन मतप्रवाह होते. एक गट राजिनामा स्विकारण्यावर आग्रही होता ते सेनेचे मातब्बर नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे राजिनामा स्विकारु नये या भूमिकेवर ठाम होते. संजय राठोड यांनीसुद्धा संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजिनामा स्विकारावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतीत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्याचेसुद्धा सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी राजिनामा स्विकारु नये याचा मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच या प्रकरणाची तुलना त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणाशी केली असल्याचेसुद्धा बोलले जात आहे.

अखेर संजय राठोड यांनी आपला राजिनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला आहे. “संपूर्ण प्रकरणातून माझी व माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रकार विरोधकांनी घडवून अाणला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशीच माझी भूमिका आहे.” राजिनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी याप्रकारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.