१५ वर्षे मराठा समाजाचा मतांचा ऊपयोग करण्याव्यतिरिक्त तुम्ही काय केले? पाटलांचा सवाल

8

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली, त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात बघायला मिळाले. महाविकासआघाडी मराठा आरक्षणाच्या बाबतीत ऊदासीन असल्याचे भाजपकडून बोलले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर विविध प्रश्नांची तोफच सरकारवर डागली आहे. मराठा समाजाचा मतांसाठी उपयोग करण्याव्यतीरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाजासाठी काय केले? असा सवाल ऊपस्थित करत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर त्यांनी निशाना साधला आहे.

“१५ वर्षे राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार होते. परंतू तरिही मराठा समाजासाठी तुम्ही काय केले? मुळात तुम्हाला समाजाची काळजीच नव्हती, तुम्हाला फक्त तुमच्या राजकारणाची काळजी होती. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना तसेच राहु द्यायचे, हेच तुमचे धोरण आहे. राष्ट्रवादीने मराठा समाजाच्या नावाने एवढी वर्ष राजकारण केलं, पण समाज कधीही पुढे जणार नाही याचीच खबरदारी घेतली. मुळात तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते.” अशा भाषेत चंद्रकांत पाटील यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1370628285411987459?s=08

मराठा आरक्षणासाठी भाजपने कसे प्रयत्न केले? याचा पाढासुद्धा त्यांनी यावेळी वाचला. अनेक वर्षापासून मराठा समाजाची प्रलंबित असणारी मागणी भाजने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला आज आरक्षणाची खुप गरज आहे. महाविकासआघाडी सरकारने सत्तेत येताच आरक्षणाचा पार खेळखंडोबा करुन टाकला. असे ते यावेळी म्हणाले.

भाजपने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि ते मिळवलंसुद्धा. परंतू सत्त‍ांतर झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजासोबत काय केले ते सांगावे? आम्ही तर ऊच्च न्यायालयात आरक्षण टीकवुन दाखवले, पण तु्म्ही काय केले? असा सवाल त्यांनी यावेळी ऊपस्थित केला.