माझ्या मध्ये काय आहे; मला लोकं एव्हडा त्रास देतात : कंगना

3

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत कायम चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूसन कायम कंगणाचे राजकीय वाद चालू आहेत. या वादामुळे कंगणाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.

या प्रकरणी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने याप्रकरणी ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्द करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, कंगणावर जोरदार टीका केली होती. कंगणाच्या ऑफिसवर झालेली कारवाई हि कायद्याने झाली आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय कट नाही असंही त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या मुलाखतीला रिट्विट करत कंगणाने उत्तर दिलंय. काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारकडून मला कायदेशीर खटले, अपमान, नेम कॉल करणे बॉलिवूड माफिया बनवते, आणि आदित्य पंचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक दयाळू लोकांसारखे दिसत आहेत…मी आश्चर्यचकित होते. की माझ्यामध्ये असे काय आहे जे लोक खूप त्रास देतात.