पुणे तिथे काय उणे : चोरांना पाहून पळून गेलेल्या पुण्यातील दोन पोलिसांवर कारवाई

52

पुण्यातून अजब बातमी आहे. पोलिसांना पाहून चोर पळाले हे तुम्ही वाचलं असेल. पण पुण्यातील औंध येथे आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. एका सोसायटी मध्ये चोर शिरले. चोर आल्याचे कोणीतरी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हे पोलीस आले खरे मात्र, चोरांना पाहून पोलिसांनीच पळ काढला.

स्थानिक नागरिकांनी चोरांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनस्थळी दोन पोलीस कर्मचारी दाखल झाले. परंतु त्यांनी या चोरांना रोखले अथवा पकडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात केलेल्या अधिक चौकशीनंतर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे वाहन निघून जाण्याआधी गोरे पोलीस हवालदार अवघडे यांना एकटे सोडून निघून गेल्याचे दिसत आहे. पोलीस नाईक अनिल अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असूनही त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. त्यामुळे दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे.