या माणसाचं काय करावं? पक्षांना दाणे खायला घातले तर पक्षी बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडले: असे म्हणत ‘सपा’च्या या नेत्याने साधला मोदींवर निशाणा

10

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.सामजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या आय.पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन निशाणा साधला आहे.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले.गुजरात आणि राजस्थानमध्येही ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरल्याचे निष्पन्न झाले. गुजरातमधील सूरत जिल्ह्य़ातून आणि राजस्थानच्या सिरोही जिल्ह्य़ातून संकलित केलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला.

आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाच फोटो ट्विट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना सिंह यांनी, “या माणसाचं काय करावं? पक्षांना दाणे खायला घातले तर पक्षी बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडले,” अशी कॅप्शन दिली आहे.