१४ व्या आयपीएल सिजनम 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. आयपीएल मधील सगळ्या संघाचे ट्रेनिंग कॅम्प सुरु झाले आहेत. मात्र, दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. क्रिकेट रसिकांसाठी ही बातमी वाईट आहे.
वानखेडे स्टेडियमवरच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं आता समोर आलंय. मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएलचे काही सामने खेळवले जाणार होते. मात्र, या बातमीने आयपीएल व्यवस्थापकांना मोठी चिंता उभी राहिली आहे.
10 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र, आता वानखेडेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने, समण्यांच काय होणार हा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला आहे.
सदरील मॅचची तयारी सवानखेडेवर जोरदार पणे सुरु होती. परंतु अशातच कोरोनाची बातमी आल्याने मोठी अडचण मुंबई क्रिकेट असोसिएशन समोर उभी ठाकली आहे.