शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार आहे? ;विखे पाटीलांचा सरकारला सवाल

32

राज्यात दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पावलं टाकली जात आहेत. अशावेळी राज्यात गोरगरीब जनतेसाठी, छोट्या व्यवसायिकांनी पॅकेज द्यावं, तर लॉकडाऊनबाबत सकारात्मक विचार करु, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे .

फक्त शहरांचा विचार करुन चालणार नाही. ग्रामीण भागातील जनतेचं काय? छोटे व्यवसायिक, शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार आहे? हातावर पोट असणाऱ्यांनी जगायचं कसं? त्यांना सरकार काही आर्थिक मदत करणार आहे का? असे प्रश्न राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारले आहेत.

राज्यात प्रभावी उपाययोजना व्हायला हव्या. आपली जबाबदारी झटकण्यासाठी लॉकडाऊन लावला जातोय. कोरोनाच्या उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊन ऐवजी उपाययोजना करा, प्रत्येक घटकाला काय मदत करणार ते जाहीर करा, अशी मागणी विखे-पाटलांनी सरकारकडे केलीय.