ज्यांचा DNA च ईटलीचा त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?

7

अयोध्येतील भव्य राममंदिरनिर्मीतीसाठी देशपातळीवर हिंदुत्ववादी संघटनांकडू निधी समर्पन अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये रा.स्व.संघ तसेच संघाच्या विचारधारेशी सलग्न असणार्‍या संघटनांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन निधी संकलन करतायेत. या निधी समर्पन अभियानावरच कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. ‘रामाच्या नावावत चंदा, हा भाजपचा धंदा’ असे वाक्य त्यांनी पत्रपरिषदेत वापरले. आता यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. सचिन सावंत यांच्या टीकेस प्रत्युत्तर देतांना भाजपा अध्यात्मिक आघाडिुचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी “ज्यांचा DNA च ईटलीचा त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?” असे म्हटले आहे.

संघपरिवार आणि भाजपाने याअगोदरसुद्धा राममंदिरनिर्मीतीसाठी पैसे गोळा केले आहेत. राममंदिरनिर्मीतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेविरोधात पैश्याचा घोळ झाला असल्याची तक्रारसुद्धा दाखल केली आहे. हा पैसा थेट राममंदिर निर्मिती ट्रस्टमध्येच जातो आहे ना याची खातरजमा प्रत्येकाने करावी. भाजपाच्या पक्ष फंडासाठीसुद्धा हा पैसा वापरला जाण्याची शक्यता अाहे. असे आरोप सचिन सावंत यांनी केले. 

यास प्रत्युत्तर म्हणू तुषार भोसले यांनी सचिन सावंत आणि कॉंग्रेसवर कडाडून टीका केली आहे. कॉंग्रश पक्ष हा कुठल्याही गोष्टीत राजकारण करतो. प्रभू श्रीराम मंदिरनिर्मीतीतही कॉंग्रेसकडून सातत्याने राजकारण करण्यात येत आहे. राममंदिर व्हावे ही प्रत्येक भारतीयाची ईच्छा आहे आणि यात कॉंग्रेस राजकारण करत असले तर यापेक्षा लाजीरवाणी बाब दुसरी कुठली नाही असे एका खाजगी वृत्तवाहिणीशी बोलतांना त्यांनी म्हटले आहे.