पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय बिघडलं ? : शिवसेना आमदार

11

पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय बिघडलं ? पोलिसही हप्ते घेतातच की असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई झाली होती. भास्कर जाधव यांनी बाबू सावंत यांची पाठराखण केली आहे. भास्कर जाधव यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नवे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

भास्कर जाधव यांनी आपल्या मतदारसंघात एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली आहे. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ? असं म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे. असे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळाता त्यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे.