संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. निलेश राणे ट्वीटमध्ये म्हणाले, संज्या सारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या असं म्हणत राऊत यांच्यावर राणे यांनी हल्लाबोल केला आहे.
कालच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मला धमकावलं जात आहे. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे. असं म्हणत त्यांनी जोरदार उत्तर दिलं. सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट शिजला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचे जे खंदे समर्थक आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु केलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘हिंमत असेल तर समोर येऊन लढावं. बायका-पोरांच्याअडून आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आम्ही समोरासमोर लढणारे आहोत. हे सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल,’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.