कोकण दौऱ्यावर असताना बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं म्हणत ‘आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं,’ असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला होता. अमित शाह यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.
कोकणातही धुरळा उडविताना तेच घडले. तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात!,’ असा घणाघाती हल्ला शिवसेनेने भाजपावर केला आहे.
अनेक ‘बैठय़ा’ मुलाखतीत शहा यांनी स्पष्ट केले आहे की, ‘बंद खोलीत काय घडले हे बाहेर सांगणे हा आपला संस्कार नाही.’ मग आता कोकणच्या ‘जगबुडी’ नदीत त्या संस्काराचे विसर्जन का झाले? हे सर्व लोक या पद्धतीने ‘उचकले’ आहेत याचे एकमेव कारण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे वैफल्य! भाजपाच्या वागण्या-बोलण्यातून आता वैफल्य स्पष्टपणे दिसत आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतोय, पण ठीक आहे. धुरळा उडवायचा म्हटल्यावर या अशा उडवाउडवीकडे दुर्लक्ष करायला हवे,’ असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
‘अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकले नाहीअसेही जोरदार प्रतिउत्तर शिवसेनेने दिल आहे.