ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्या भरती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांना नुकताच जमीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यावर हर्ष लिम्बाचियाने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्नी भारती सिंग सोबतचे तीन फोटो शेयर केले आहेत. आणि लिहिलं आहे की ‘जेव्हा आम्ही एकत्र सोबत असतो, तेव्हा इतर काहीही आमच्यासाठी महत्वाचं नसत’ त्याच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत.
प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचियाला काही दिवसांपूर्वीच ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो ने अटक केली होती. टीव्ही इंडस्ट्रीतिल अनेक जण भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचियाचं समर्थन करत आहेत. भारती सिंगला बहीण मानणारा तिचा सहकलाकार कॉमेडियन कृष्णा अभिषेकने भारतीला खुलेआम समर्थन दिलं आहे. ड्रग्स प्रकरणानंतर भारती सिंगला ‘द कपिल शर्मा शो’ मधून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा होती.मात्र यावरही कृष्णाने प्रतिक्रिया दिली. कृष्णा आणि किकू शारदा यांनी ही अफवा असल्याचं म्हटलं आहे.भारती आणि हर्षला अटक केल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटीच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.ज्यातील बरेच सेलिब्रेटी हैराण होते.
भारतीचा सहकलाकार कृष्णा अभिषेकने भारतीचे समर्थन करत ‘त्याला या जगाची काहीही पडलेली नाही’ परंतु कोणतीही वेळ आली तरी तो भारतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अस त्यानं म्हणलं आहे. तसेच चॅनल भारतीला काढून टाकण्याच्या कोणत्याही निर्णयापर्यंत पाहोचले नसल्याच त्यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी भारती सिंगने देखील जमीन मिळाल्यावर शूटिंगबाबत पहिली पोस्ट केली होती.