पुण्यातील कोरोना साथीची व्यापकता पाहता प्रतिबंधक लस देणे आवश्यकच आहे. पंतप्रधानांनी त्याकरीता लसोत्सव जाहीर केला. पण, पुण्यात पहिला डोस, दुसरा डोस यासाठी लोकांची धावाधाव चालू आहे.
अद्यापही पुण्याला व्हेंटिलेटर्स मिळालेले नाहीत. दिवसेंदिवस येथे रुग्ण वाढत असताना ही दिरंगाई अक्षम्य आहे, केंद्र सरकारकडून हे व्हेंटिलेटर्स मिळणार कधी असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.
भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचे पुण्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी टीका सर्वत्र होऊ लागल्याने त्यावर थातुरमातुर मलमपट्टी करण्यासाठी केंद्रीय मंत्री जावडेकर नऊ एप्रिल रोजी पुण्यात आले होते.
कोवीडग्रस्त पुण्याला केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर्स पुरविले जातील अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चौदा दिवसांपूर्वी केली होती.
जावडेकरजी तुम्ही जाहीर केलेली १,१२१ व्हेंटिलेटर्सची मदत कधी मिळणार याची पुणेकर वाट बघत आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.