मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत राज्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा हवाला देत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? हे कधीपर्यंत असंच चालणार? असे सवाल करत पाटील यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?,” असे प्रश्न पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना केले आहेत.
आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारसह सगळ्यांचं लक्ष राज्यातील एका महत्त्वाच्या विषयाकडे वेधून घेतलं आहे.