कुठे हिमालय आणि कुठे मुतखडा; ‘यांनी’ केली भाजपच्या गोपीचंद पडळकरांवर टीका

1434

सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेलं पत्र सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनलं आहे. सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी असा संदेश आहे. या पत्राचा हेतू अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी नाराजी व्यक्त करण्याबाबत असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यामुळेच हे पात्र लिहिलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे.

‘महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील असल्याचं मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्याची पोचपावतीच दिली आहे, असं सांगतानाच आता तरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठीची लाचारी झुगारून आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा,’ असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.

गोपीचंद पडळकरांच्या या टीकेला महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सोनिया गांधी यांनी ठाकरे सरकारला अल्पसंख्यांक समाजाविषयी पत्र लिहून मानवता जोपासली आहे. कुठे हिमालय आणि कुठे मुतखडा,’ अशा शब्दांत त्यांनी पडळकरांची खिल्लीच उडवली आहे.