सध्या राज्यातील पुजा चव्हान आत्महत्या प्रकरण निर्भीडपणे ऊचलुन धरत असल्यामुळे चित्रा वाघ या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत. चित्रा वाघ यांचे प्रभावी वकृत्व, आक्रमकता, विषयाची मुद्देसुद मांडणी यांमुळे राजकीय क्षेत्रात नव्याने येणार्या महिलांसाठी, तरुणींसाठी त्या रोल मॉडल ठरत आहे. पुजा चव्हान आत्महत्या प्रकणांत संशयित असणार्या वनमंत्री संजय राठोड यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सातत्याने आवाज ऊठवत असणार्या चित्रा वाघ यांच्याबद्दल जाणुन घेण्यासाठी राजकीय क्षेत्रातील तरुण तरुणींमध्ये ऊत्सुकतेचे वातावरण आहे.
चित्रा वाघ या मुळच्या मुंबई येथील आहे. अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रीय झाल्या. मुंबईतील चित्रा वाघ यांचे कार्य बघता राष्ट्रवादीने त्यांच्यावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षोदाची जवाबदारी सोपवली. २०१४ नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षात होते. यावेळी चित्रा वाघ यांनी अनेक महिलांचे प्रश्न मांडले.
महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असतांना चित्रा वाघ यांनी संघटनेच्या बांधणीत महत्वाची भूमिका निभावली आहे. राज्यभर दौरे करुन त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला. सुप्रिया सुळेंसोबतसुद्धा चित्रा वाघ यांनी दीर्घकाळ कार्य केले आहे. कोपर्डी हत्याकांडाच्यावेळीसुद्धा चित्रा वाघ यांनी आवाज ऊठवला होता.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या पदाचा राजिनामा देत भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. भाजपने चित्रा वाघ यांच्या अनुभवाची दखल घेत त्यांना थेट प्रदेश ऊपाध्यक्षपदाची जवाबदारी सोपवली. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप अाहते. त्यामुळे पतीला वाचवण्यासाठी चित्रा वाघ भाजपात गेल्या असल्याच्या चर्चासुद्धा त्यावेळी रंगल्या होत्या.
भाजपातसुद्धा चित्रा वाघ यांनी भरीव कार्य करण्यास सुरुवात केली. भाजप सध्या विरोधी पक्षात असल्यामुळे राज्यात महिलांवर होणार्या वाढत्या अत्याचारांविरुद्ध त्या सातत्याने बोलत असतात. पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणांत चित्रा वाघ यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप महिला मोर्चा चित्रा वाघ यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर ऊतरला आहे. महिलामोर्चाच्यावतीने संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यात विविधठिकाणी निदर्शने होत आहे.