कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करावी : मनसेची मागणी

9

कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणे गरजेचे असल्याने असा महापिलाकंनी जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

काही परिवारातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले असल्यामुळे परिवारावर आर्थिक संकटं कोसळली आहे. यामध्ये राज्य सरकारने अशा कुटुंबीयांना १ लाखाची मदत करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. 

बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत.हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्या च कामाला आला पाहिजे. कोरोना मुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणे गरजेचे आहे.

सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकार ने सरसकट तसा आदेशच दयायला हवा अशीही मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.