भोगा षंढत्वाची फळे…!

65

अ‍ॅड शिवाजी जाधव, मुंबई

एखाद्या जलाशयात जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने विष टाकल्यानंतर ज्या पद्धतीने त्या पाण्यातील जीव जंतू विशेषतः मासे तडफडून मारतात अगदी त्याचप्रमाणे मागच्या काही दिवसांपासून लहान मोठे, गरीब श्रीमंत लोकं रुग्णालयातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे (औषध, बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ आणि निदान व उपचाराची उपकरणे) मरताहेत. मागच्या वर्षी एप्रिल-मे मध्येहि काही निष्पाप लोकांना कोरोनामुळेच जीव गमवावा लागला होता. ठीक आहे कोरोना सर्वांना नवीन होता, निदान व उपचार समजायला थोडा काळ लागला. पण आता एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे तरीही राज्यकर्ते आणि प्रशासन झोपेतच आहे.

का निवडून देतो आपण राज्यकर्ते, का देतो त्यांच्या हातात सत्ता (राज्य असो वा केंद्र)? सर्व स्वर्थी राज्यकर्ते व प्रशासनातील काही अत्यल्प अपवाद वगळता इतर अधकरिही सगळ्या अवैध अनैतिक कामात पुढे असतात, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार हफ्ते इत्याद त्यांना अतिप्रय. मोठ-मोठे बंगेल, महागड्या गाड्या, जास्तीती जास्त सुट्ट्या, जास्तीत जास्त पगार, ठीक-ठिकाणी सवलती तर हमखास लागतातच व सर्वात म्हत्वाचे म्हणजे थोडेसे कोणी प्रश्न विचारलं रे विचारलं कि सरकारी कामत अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हे दाखल करणे वगैरे कायदेविषयक बाबींची मदत लागते. पण यांना काम, जबाबदारी नकोच असते. दोन्ही सरकारमधील मंत्री, नेते लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी इत्यादी लोकं मागच्या एक वर्षात कामं केली नाहीत? का यांनी करोडो रुपये खर्च करून उभी केलेली कोव्हीड सेंटर बंद केली, का ऑक्सीजन निर्मिती व पुरवठा वाढवला नाही, का व्हेंटीलेटर्स वाढवले नाहीत. का डॉक्टर, नर्सेस व स्टाफची संख्या वाढवली नाही का. का सर्व आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा निर्माण केल्या नाहीत इतर देशांप्रमाणे ?

प्रशासन आणि राज्यकर्ते कोणीही आता निष्पक्षपणे, जबादारीने, निष्ठेने, लोकभावनेने काम करत नाहीत (काही अत्यंत अत्यल्प अपवाद वगळता) हे वेगळे सांगायची गरज नाही. कोणत्याही वैध-अवैध पद्धतीने अमाप पैसे, संपत्ती कमविणे आणि मुलाबाळांचे भविष्य सुखदायी करणे यापेक्षा वेगळे ध्येय कोणत्याच राज्यकर्त्यांचे व प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दिसतच नाही.

मग आपण आणि आपल्यासारखे सुशिक्षित ‘मूर्ख’ लोकं लागतो राज्यकर्त्यांची आपल्या तुटपुंज्या फायद्यासाठी, लोकांच्या दैनंदिन जीवनात फारशी उपयोगी नसलेली थोतांड विचारधारेसाठी वकिली करायला. कोणी केंद्र सरकारमधील राज्यकर्त्यांना दोष देतो तर कोणी राज्य सरकारमधील राज्यकर्त्यांना दोष देतो. व एकमेकांवर टीका करत राहतात पण समस्यांचे मूळ, त्यावर उपाययोजना करण्याची अक्कल या पक्ष, विचार, धर्म, रंग, जातप्रेमी लोकांना कधीच येणार नाही. कारण सर्वांचा यामध्ये कुठे ना कुठे आर्थिक, राजकीय व वैयक्तिक फायदा दडलेला असतो. म्हणून कोणतेही नगरीक सत्ताधरी व वोरोधातील राज्यकर्त्यांवर कडाडून टीका करताना दिसत नाहीत.

आणि जनतेचे षंढत्व राजकीय पक्ष, राज्यकर्ते, विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधाकारी कर्मचारी चांगल्या पद्धतीने ओळखून आहेत. त्यांना हेही चांगलच माहीत आहे आपल्या देशातील व राज्यातील षंढ नागरिक एकत्र येऊन खऱ्याच्या व वास्तवाच्या बाजूने राहून राजकारण विरहित प्रयत्न करून चुकीचे काम करणाऱ्या किंवा काहीच न करणाऱ्या राज्यकर्त्यांचा कधीच विरोध करणार नाहीत कारण ते जात, धर्म, पक्ष, विचारधारा, रंग, सत्तापक्ष व विरोधीपक्ष यात विभागले गेले आहेत.

मागच्या एक वर्षापसून केंद्र आणि राज्य सरकारने, विरोधीपक्षाने दोघांच्या नियंत्रणात असलेल्या अधिकाऱ्यांनी योग्य काम केला असता, सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा निर्माण केल्या असत्या तर आज हि परिस्थिती निर्माण झाली नसती आणि माणसं विष घातलेल्या जलाशयातील जीवजंतू विशेषतः मास्यांप्रमणे तडफडून मेली नसती. राजकीय लोकांनि व त्यांची प्रत्येक बाबींवरून वकिली करणाऱ्या आणि त्यांना मतदान करणाऱ्या लोकांनी आता तरी प्राधान्य बदलले पाहिजे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या महाप्रकोपाला केवळ केंद्र व राज्य सरकारमधील व विरोधातील राज्यकर्ते व प्रशासन यांचा नाकर्तेपणा, निष्काळजीपणा, हेकेखोरपणा, लोकसेवेचा ढोंगीपणा व त्यांचे घाणेरडे राजकारणच जबादार आहे.