काल शुक्रवारी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी आपल्या प्रकरणी चांगलेच फटकारले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगना राणावत हीचे मुंबई येथील कार्यालय अवैध ठरवून बांधकाम तोडले होते त्यांनतर कंगना राणावत हिने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. काल त्याचा निकाल आला त्यावर BMC ला चांगलेच फटकारले आहे.
तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी पत्रकार अर्णव गोस्वामी याला अटक केली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाने काल टिप्पणी केली की सरकार असे पूर्वग्रह दूषित पद्धतीने करवाई करु शकत नाही.
त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांची माफी माघावी अशी मागणी केली.