बॉलीवूड मुंबईत महाराष्ट्रात आहे. मात्र, बॉलीवूडला युपीमध्ये नेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येत चाचपणी केली. तसेच प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. त्यावर आता चर्चेला विषय मिळाला आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत सर्व सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोणीही मुद्दाम बॉलिवूड महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊ नये, असेही अशोक चव्हाणांनी सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र किंवा मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य आहे. अनेक कलाकार हे मुंबईत राहतत. मुंबईत सवलती सोयी, फिल्मसिटी, लोकेशन यासारख्या विविध ठिकाणं आहेत. काही वेळा परदेशात जाऊनही शूटींग केली जाते. त्यामुळे कोणी मुद्दाम बॉलिवूड कुठे घेऊन जावू नये. शूटींग करण्याइतपत लोकेशन महाराष्ट्रात आहेत. फिल्मसिटी आहे. एवढं असताना कोणी युपीला जाईल, असे वाटत नाही, असेही अशोक चव्हाणांनी सांगितले.