पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषणं हा नेहमिच चर्चेचा विषय असतो. नरेंद्र मोदींचे अनेक भाषणं गाजली आहेत. तर विरोधकांकडून त्यावर टीकासुद्धा करण्यात आली आहे.नरेंद्र मोदी हे ऊत्तम वक्ते आहेत. लाखोंच्या सभेला संबोधीत करतांना मोदी त्यांच्या बोलण्याची छाप श्रोत्यांवर टाकत असतात, असे आपण नेहमिच बघत असतो. मग अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एवढे प्रभावी आणि माहितीपूर्ण भाषणं लिहीतं कोण हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. आणि हाच प्रश्न थेट पंतप्रधान कार्यालायाला माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आला आहे.
पंंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं कोण लिहीतं? त्याला किती खर्च येतो? यामध्ये किती लोक सहभागी असतात? असे सवालच थेट पंतप्रधान कार्यालयाला माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आले आहे. यामध्ये खर्च किती येतो याचा ऊल्लेख पंतप्रधान कार्यालयाने केलेला नाही. मात्र अन्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
पंतप्रधान स्वत:च आपल्या भाषणाला अंतिम स्वरुप देतात असे पीएमअोने म्हटले आहे. तसेच विविध स्त्रोतांच्या आधारे माहिती गोळा केली जाते. कार्यक्रमाचे स्वरुप बघून संबंद्धित तज्ज्ञ व्यक्ती, अधिकारी, विविध संघटना पंतप्रधानांना माहिती ऊपलब्ध करुन देतात. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच या छोट्या छोट्या ईनपुट्सच्या आधारावर भाषणाला अंतिम स्वरुप देत असतात.
२०१४ च्या निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताचे दौरे केले. यावेळी त्यांनी लाखोंच्या जनसभेला संबोधीत केले आहे आणि आपल्या बोलण्याने थेट लोकांच्या मनावर छाप पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे नेहमिच कौतुक होत असते. भाषणाच्याबाबतीत यमाजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंक्तीत नरेंद्र मोदींना बसवण्यात येत असते.