कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर वगळण्याचा WHO चा निर्णय 

13

WHO ने कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर वगळण्याचा निर्णय घेतला आहे.रेमडेसिवीर वगळण्यात आल्यास कोरोना उपचार पद्धती बदलण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या प्रोटोकॉलमध्ये या औषधाचा समावेश आहे.अस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

2014 साली आफ्रिकी देशांमध्ये एबोला विषाणूने थैमान घातलं, तेव्हा उपचारांसाठी त्याचा प्रभावी उपयोग झाल्यावर हे औषध चर्चेत आलं. मर्स, सार्स यांसारख्या एन्फ्लुएंझा संसर्गांमध्येही त्याचा चांगला उपयोग झाला.

कोरोना विषाणूची शरीरात वाढ होण्याला रेमडेसिवीर पायबंद घालतं, असं तज्ज्ञ म्हणतात.दरम्यान देशातील टास्क फोर्स आणि राज्यातील टास्क फोर्सशी याबाबत चर्चा केल्यानंतर राज्यातही कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.अशी त्यांनी सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयानंतर आता केंद्र आणि राज्य सरकारही याबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.