15 एप्रिलपर्यंत देशात 50 हजार लोकांचा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. हा व्हिडिओ खोटा असल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
WHO ने ट्विट करत म्हटलंय की, 15 एप्रिलपर्यंत देशात कोरोनामुळे 50 हजार मृत्यू झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ फेक आहे. WHO ने असा कोणत्याही प्रकारचा इशारा दिला नाहीये.
व्हिडिओत असा देखील दावा केला गेलाय की, भारतासाठी येणारे 72 ते 108 तास खूपच महत्त्वपूर्ण आहेत. या व्हिडिओमध्ये WHO आणि ICMR चा हवाला दिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असं देखील म्हटलं गेलंय की भारत लवकरच सामुदायिक संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचू शकतो.