जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी करेक्ट कार्यक्रम या शब्दावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. पंढरपूरच्या सभेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम करतो हा शब्द वापरला होता.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांची निवडणूक प्रचार बंदी लावण्यात आली आहे. त्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप नेहमीच मतांचं ध्रुवीकरण करत आला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, असंही ते म्हणाले
काल पंढरपुरातील सभेत राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला सूचक इशाराच दिला होता.
त्यावर त्यांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला.