‘माझा फोटो का काढला, जया बच्चन फोटोग्राफरवर संतापल्या

20

माध्यमांच्या प्रतिनिधींकडून सेलिब्रेटींना होणारा त्रास हा काही नवीन नाही आहे. अनेकदा त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचे फोटो देखील व्हायरल केले जातात. अनेकदा ते आपल्या चाहत्यांवरही फोटो काढल्यामुळे नाराज झालेल्या, रागावलेल्या दिसल्या आहेत. यापूर्वीही काही सेलिब्रेटींनी यावरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी विराटनंही एका फोटोग्राफरला त्याचा आणि अनुष्काचा फोटो काढला म्हणून सुनावले होते. आता पुन्हा एक असे प्रकरण समोर आले आहे.

जया बच्चन त्यांच्या सडेतोड उत्तरासाठी नेहमी चर्चेत असतात. आपल्याला जे आवडले किंवा पटले नाही त्याच्या विरोधात बोलण्याकरिता ते नेहमी सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचे पाहायला मिळते. त्यांना स्वतःचे फोटो काढलेले जास्त आवडत नाहीत. फोटोग्राफरना लाईव्ह फोटो गरजेचा असल्यास ते सेलिब्रेटींचा पाठलाग काही केल्या सोडत नाहीत. त्यांच्याबाबत पुन्हा असाच एक प्रकार घडल्य़ानं त्या चिडल्या आहेत. त्यावरुन त्यांनी संबंधित फोटोग्राफरला ओरडल्या आहेत.

या प्रकरणावरून फोटोग्राफरला अखेर माफी मागावी लागली आहे. त्या एका डेंटल क्लिनिकमध्ये निघाल्या होत्या. त्यावेळी एक फोटोग्राफर त्यांचा पाठलाग करत होता. त्या गाडीतून उतरल्यावर फोटोग्राफरने त्यांचे फोटो काढले. हे जेव्हा जया बच्चन यांनी पाहिले तेव्हा त्या फोटोग्राफरवर संतापुन म्हणाल्या की, तुम्ही येथे पण पोहचलात का, त्यावर उत्तर देताना तो फोटोग्राफर म्हणाला, तुमची गाडी पाहिली म्हणून थांबलो. अखेर त्या फोटोग्राफरने जया बच्चन यांची माफी मागितली.