शिवरायांना जन्म देण्यासाठी जिजाऊ माहेरी का गेल्या नाहीत ? मग, जिजाऊंचे बाळंतपण कोणी केले वाचा…

23

आजची सासुरवाशीण बाळंतपणासाठी २/३ महिने आधीच माहेरची वाट धरते. मात्र, राजमाता जिजाऊ शिवरायांना जन्म देताना बाळंतपणासाठी माहेरी जाऊ शकल्या नाहीत. त्यांना बाळंतपणासाठी माहेरी जाण्यासारखी परिस्थितीही नव्हती. सहाच महिन्यांपूर्वी वडील लखुजी जाधव आणि भाऊ अचलोजी, रघुजी यांची एकत्रितपणें निजामशहाने हत्या केली. तो मोठा आघात राजमाता जिजाऊ यांच्यावर झाला होता. या आघाता दरम्यान, शिवराय जिजाबाई यांच्या उदरात होते. लखुजी जाधव म्हणजेच जिजाबाई यांच्या वडिलांच्या आणि भावांच्या हत्येमुळे जिजाऊ बाळंतपणासाठी माहेरी जाऊ शकल्या नाहीत.

म्हणून मग, शहाजी राजांनी जिजाबाई यांच्या बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्याची निवड केली. शिवनेरी किल्ल्याची निवड करण्याची कारणं दोन, पहिलं म्हणजे शिवनेरी गड सुरक्षित होता. दुसरं म्हणजे शिवनेरीचे किल्लेदार विजयराव सिंधोजी विश्वासराव हे पराक्रमी तर होतेच; सोबतच ते भोसले घराण्याचे व्याही होते. किल्लेदार विजयराव यांची कन्या जयंती आणि बहीण दुर्गाऊ ह्या दोघी भोसले घराण्याचा सूना होत्या. त्यामुळे स्वतः शहाजी राजे, किल्लेदार विजयराव, संभाजी, दुर्गाऊ, जयंती, उमाबाई, लक्ष्मीबाई इत्यादी सर्व राजमाता जिजाऊ यांची काळजी घेण्यासाठी त्याठिकाणी तत्पर होते.

किल्लेदार विजयराव यांची मुलगी जयंती आणि बहीण दुर्गाऊ यांनी जिजाऊंचे बाळंतपण केले. दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचं जन्म झाला. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहेच. शिवनेरी गडावर आनंदीआनंद झाला. स्वराज्याचा संस्थापक जन्माला आले.

रोहित गिरी 9604312182
संदर्भ : जगातील सर्वोत्तम राजा – काशिनाथ मढवी