बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मींग का करताय : आशिष शेलार

13

सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय. ‘बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मींग का करताय, याचं उत्तर अगोदर सुप्रिया सुळेंनी द्यावं. बारामती अॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग अगोदर बंद करावं, मग आंदोलक शेतकऱ्यांना गाझीपूरला भेटायला जावा, असा टोलाच शेलार यांनी खासदार सुळेंना लगावलाय.

सुप्रिया सुळे साधणार आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांवर ही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेत्यांनंतर आता विरोधकांच्या शिष्टमंडळाने शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. 

शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, शर्जील उस्मानी, शेतकऱ्यांच आंदोलन आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले आहे.

देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर जाऊ शेतकरी नेते राकेश टीकेत यांची भेट घेतली होती.