ग्रामीण भागातील एका सामान्य महिलेला जे कळतं, ते केंद्र सरकारला का कळत नाही ?

31

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या निमित्त गोंदिया जिल्ह्यात . पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीतनंतर जाहीर सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी संबोधित केले.

“गोंदियाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांना साथ दिली आहे. इथल्या जनतेच्या आशिर्वादाने आणि प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने या भागात राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आलेला आहे. प्रफुल पटेल यांनी गोंदियाच्या विकासासाठी नेहमी पाठपुरावा केला. विशेषतः धापेवाडा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ते आग्रही आहेत. धापेवाडीचा दुसरा टप्पा पुर्ण करण्यासाठी पुढच्या आर्थिक वर्षात १०० कोटींचा निधी देण्याची प्रयत्न करु”, अशी घोषणा प्रदेशाध्यक्षांनी केली.

प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, “परिवार संवाद दौऱ्यानिमित्त काल एका भगिनीने BHEL सुरु करण्याची मागणी केली. पण केंद्र सरकारने मागच्या काही काळात एकापाठोपाठ एक सरकारी कंपन्या विकण्याचा धडाका लावला. मला आश्चर्य वाटले, ग्रामीण भागातील एका सामान्य महिलेला जे कळतं. ते केंद्र सरकारला का कळत नाही?

आज पेट्रोलने नव्वदी पार केली. युपीए सरकारच्या काळात २० पैसे जरी वाढले तरी विरोधक बोंबाबोंब करायचे. मात्र मागच्या वर्षभरात पेट्रोल १२ रुपयांनी वाढले. तरिही सर्व चिडीचूप का?” असा सवालही जयंत पाटील यांनी केला.