निलंबित पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री राजीनामा का देत नाही? असा प्रश्न भाजप खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्कादायक मानला जात आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने 15 दिवसांत चौकशी करुन अहवाल द्यावा, असं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे.