का? संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ‘ईडी’ने पाठवली नोटीस

7

मंगळवारी २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस धाडली आहे. 

आपल्याला यासंबंधी माहिती नाही, नोटीस आल्यास पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथीया…’ असे ट्विट करून संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. पीएमसी बँकेतील वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यातून काही प्रकारचे व्यवहार झाले असून या व्यवहारामागील कारण ईडीला जाणून घ्यायचे आहे.

या खात्यात सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे ईडीच्या निदर्शनास आल्याचे कळते. त्यासाठीच वर्षा राऊत यांना कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे संतापले आहेत.