मोदी शाह गप्प का?संजय राऊतांचा सवाल

14

एरव्ही देशातील प्रत्येक घडामोडींवर पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री शाह आपले मतप्रदर्शन करीत असतात. राहुल गांधीपासून ते मनता बॅनर्जीपर्यंत तोंडसुख घेत असतात. मात्र देशाला काळीमा फासणारी घटणा यावर्षिच्या प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे घडली. परंतू यावर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जे घटनेच्या महत्वाच्या पदांवर विराजमान आहे ते शांत आहेत. मोदी आणि शाह गप्प का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकमधून केला आहे.

संजय राऊत यांचे सामनातील रोखठोक हे सदर कायमच चर्चेचा विषय ठरत असते. या सदरात त्यांनी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घालत शेतकरी आंदोलनात फुट पाडली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिल्लीत झालेल्या हिंचारानंतर दोन संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या. लाल किल्ल्यावरील हिंसाचार हे कारण त्यासाठी दिले, लाल किल्ल्यावरील हल्ला हा त्याच राजकीय कारस्थानाचा भाग होता काय, अशी शंका त्यामुळं बळावली असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

शेतकरी आंदोलनाला देशद्रोही कृत्य असल्याचे रंग देण्यात येत आहे. खलिस्तानी म्हणून त्यांना हिणवण्यात येत आहे. यावर ठोस भूमिका सरकारने घेण्याची गरज आहे. अन्यथा शेतकर्‍यांचा संयम सुटल्यास त्याचे विपरीत परिणाम देशावर होऊ शकतात. पंजाब अशांत झाल्यास काय होते याचा अनूभव याअगोदर आपल्या देशाला आलेला आहे. त्यामुळे पंजाब अशांत होणार नाही यादृष्टीन यावेळी पावलं टाकणं जरुरी असल्याचे त्यांनी सदरातून म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरदेखील संशय व्यक्त करण्यात आला. एरवी आपले राज्यपाल राज्याचे व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत असतात, पण हजारो शेतकरी स्वतःच आपले प्रश्न घेऊन राजभवनाकडे निघाले तेव्हा शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याची आयतीच संधी नाकारून राज्यपाल गोव्यास गेले. अशी टीका रोखठोक या सदरातून करण्यात आली.