“एक दिवसाच्या नर्सबाई” मुंबई महापौरांवर का होतेय टीका?

14

अचानकच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होते आहे. सुरुवातीला मुंबई आणि पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. आता मात्र विदर्भातून कोरोनाचा फैलाव वेगाने होतो आहे. परंतू पुर्वीसारखी परिस्थिती मुंबईवर पुन्हा येऊ नये म्हणून पालिका प्रशासन एक्शनमध्ये आले आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट रस्त्यावर ऊतरुन जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. परंतू यावरुनच मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी किशोरी पेडणेकरांवर टीका केली आहे.

किशोरी पेडणेकर स्वत: रस्त्यावर ऊतरुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच विनामास्क फीरणार्‍यांना मास्कचे वाटप करुन जनजागृती करत आहे. मात्र हे दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात वेगळे असल्याचा प्रकार असल्यासारखे आहे. असा रोख घेत संदिप देशपांडे यांनी महापौरांवर निशाना साधला आहे. महापौरांचे रस्त्यावर ऊतरुन सुरु असलेल्या कार्याचा संदर्भ घेत “एक दिवसाच्या नर्सबाई” असा टोला संदिप देशपांडे यांनी लगावला अाहे.

नव्याने आढळून येणार्‍या रुग्णसंख्येवर संदिप देशपांडे यांनी शंका व्यक्त केली आहे. अधिवेशनावर निर्बंध आणण्याकरिता सराजारचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यादरम्यान संदिप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचेच नेते कसे पॉझीटीव्ह येतात असा सवाल करत जनतेच्या प्रश्नांना ऊत्तरे देण्यापासूची ही पळापळी असल्याचे म्हटले होते.

संदिप देशपांडे हे सातत्याने शिवसेना आणि सरकारला निशाना करते आहे. अधिवेशनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपच्या गटातूनसुद्धा होतो आहे. संदिप देशपांडे यांनी अनेक प्रश्न ऊपस्थित करत ही शंका व्यक्त केली आहे.