सशर्त
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अस्थिविसर्जन व दशक्रियाविधीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. दिवसेंदिवस मृत्यूच प्रमाण वाढत आहे.
वेदमूर्ती नारायण गुरूजी जोशी, शंकर आजेगावकर, वेदमूर्ती गजानन जोशी, वेदमूर्ती उमेश जोशी, वेदमूर्ती रवी जोशी, वेदमूर्ती शिरीष जोशी, वेदमूर्ती अशोक जोशी, वेदमूर्ती दिपक जोशी आदीनी काल एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे मागणी केली आहे.
गंगाखेड येथे मोठ्या प्रमाणात लोक अस्थिविसर्जन व दशक्रियाविधीसाठी येत असतात. सध्याच्या कोविड महामारीच्या संकटामुळे विधी बंद असल्यामुळे येणा-या लोकांची गैरसोय होत आहे व अनेक समस्या ही निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विधीला सशर्त परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.