ऑनलाइन सभा घेण्याच्या भाजपच्या निर्णयावर आक्षेप घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यसभा घेण्यासाठी संमती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी विनंती केली.
अजित पवार 1 जानेवारी रोजी महापालिकेच्या सभागृहात भामा-आसखेड प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमास आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांची शुक्रवारी दुपारी व्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत स्थानिक नेत्यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा होत नसल्याबद्दल तक्रार केली आहे.
त्या सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम घेता मग सर्वसाधारण सभा का घेत नाही? लग्नासाठी आपण व्यक्तींना परवानगी देतो, मग सर्वसाधारण सभा घेण्यास काय अडचण आहे? त्यानंतर त्यांनी लगेचच सचिव गुप्ता यांच्याशी संपर्क साधत पुणे महापालिकेला सर्वसाधारण सभा घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी सूचन पवार यांनी बोलते वेळी केली.
राज्यशासन मुख्यसभा घेण्यास मंजुरी देत नसल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मुख्यसभा ऑनलाइन घेत त्यात, धोरणात्मक निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. पण, ‘भामा- आसखेड प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महापालिकेला चालतो, मात्र मुख्यसभा का नको?’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केला.
पवार यांनी थेट सचिव असीम कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधत सभा घेण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.गुप्ता यांनी परवानगी दिली, तर महापालिकेची आगामी सर्वसाधारण सभा आणि अर्थसंकल्पीय खास सभा महापालिकेच्या सभागृहात घेणे शक्य होणार आहे.