सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदललं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे हे खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्या या मागणीला पाठिंबा देत सचिन वाझेंवर कारवाईची मागणी केली होती. पण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली केली जाईल असं सांगितलं. अखेर एनआयएच्या तपासात सचिन वाझेंवर काही आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अटक करून निलंबित केले. अशा परिस्थितीत, ‘सचिन वाझेंना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
देशमुखांना बदललं जाणार की मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग हे मात्र निश्चित होऊ शकलं नाही. एनआयएचा तपास हा सरकारच्या गळ्याचा फास बनत चालला आहे.
पक्षाचा गृहमंत्री जर एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पाठीशी घालत असेल तर ही खूपच खेदजनक बाब आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनाम घेतला गेलाच पाहिजे. किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.