बारामतीत काल केलेल्या (ता. 17) 749 तपासण्यांपैकी आज 307 जण पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान तब्बल 305 नमुन्यांचे अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहेत. एकूण केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण आज 41 टक्क्यांवर पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे.
कोविड केअर सेंटरमधील क्षमताही दिवसागणिक वाढवली जात असताना रुग्ण संख्याच वेगाने वाढू लागल्याने या यंत्रणेवरही ताण येऊ लागला आहे ही वस्तुस्थिती आहे.
रुग्णसंख्या झपाटयाने वाढत असताना दुसरीकडे तुलनेने या इंजेक्शनचा पुरवठा तोकडा असल्याने अनेकांच्या जीवावर बेतेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
एकूण केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण आज 41 टक्क्यांवर पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे. अशाच पध्दतीने जर लोक पॉझिटीव्ह येत राहिले तर आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल अशी भीती आता व्यक्त होत आहे.