दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली. त्यानंतर विरोधी बाकांवरील अनेक राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाव न घेता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याची घोषणा केली होती.त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नाव न घेता संजय राऊत यांना खोचक प्रश्न विचारला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?? असा सवाल संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना विचारला आहे.