महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धिरोत्तरपणे संकटाला सामोरे जात आहेत. वेळोवेळी त्यांच्या या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे.
आता मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. पत्नी आणि मुलगा कोरोनासोबत लढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र, महाराष्ट्र सांभाळत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. टीका करणं सोपं पण उद्धव ठाकरे होणं अवघड असल्याचं त्यांनी म्हटलंय.
जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात, “पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत.. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत त्यांना सलाम केला आहे.