महाराष्ट्रासोबत झालेला सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल काय? : शिवसेना

15

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तत्काळ कोकणच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जनता व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वादळग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिवसेनेने याच मुद्द्यावरुन भाष्य करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडे मदत मागितली पाहिजे असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रासोबत झालेला सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल काय? अशी विचारणाही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

पंतप्रधानांचे हे वागणे भेदभावाचे आहे व महाराष्ट्राला मदत न करण्याची त्यांची भूमिका धक्कादायक असल्याचे मत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मांडले.असेही त्यात म्हणले आहे.

वादळग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. हीच मागणी त्यांनी अधिक जोरकसपणे केंद्राकडेही केली पाहिजे,’ अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.