पेट्रोल पंपावरील नरेंद्र मोदींचे फोटो असलेले होर्डींग्ज हटवणार ……

28

पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो असलेले विविध योजनांचे मोठमोठाले होर्डींग्ज आपल्याला दिसतात. परंतू आता हे होर्डींग्ज हटवण्यात येणार आहे. पंश्चिम बंगालमध्ये निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदींच्या या मोठमोठाल्या फोटोंनी मतदार प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे होर्डींग्ज काढण्यात यावेत असे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहे.

पंश्चिम बंगालमध्ये निवडणुक येऊ घातली आहे. तृणमुल कॉंग्रेसला शह देण्यासाठी भाजप पूर्ण ताकतीने प्रचारात ऊतरला आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये सभांचा सपाटाच लावला आहे. नरेंद्र मोदीसुद्धा भाजपचे स्टार प्रचारक आहे. अशांतच त्यांचे पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या फोटोंमुळेमतदार प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच या होर्डींग्जमुळे आचारसंहितेचे ऊल्लंघन होऊ शकते. असे म्हणत निवडणुक आयोगाने ७२ तासांच्या आत होर्डींग्ज काढण्याचे निर्देश दिले आहेत.

तृणमुल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी(दि.३ मार्च) निवडणुक आयोगाची भेट घेतली होती. यावेळी हा मुद्धा ऊपस्थित करण्यात आला होता. तसेच लसीकरण झाल्यानंतर देण्यात येणार्‍या प्रमाणपत्रांवरसुद्धा मोदींचे फोटो छापुन येतायत. यावरसुद्धा तृणमुल कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.

कोरोनावरील लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असणारे मोदींचे फोटो आणि पेट्रोल पंपांवरील त्यांचे फोटो असलेले मोठमोठाले होर्डींग्ज हे आचारसंहितेचे ऊल्लंघन असल्याचे तृणमुल कॉंग्रेसने म्हटले होते. त्यामुळे यावर योग्य पाऊल ऊचलण्यासाठी तृणमुलच्या नेत्यांनी निवडणुक आयोगाची भेट घेऊन सबंद्धित विषय आयोगासमोर मांडला आहे. असे पंश्चिम बंगालचे मंत्री फरहाद हाकिम यांनी सांगीतले.