महाविकास आघाडीचे गेंड्याच्या कातडीचे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल का ?

35

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं आहे.

या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर यासर्व प्रकरणाची युजर चघळण करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, महाविकास आघाडीचे गेंड्याच्या कातडीचे सरकार राजीनामा घेईल का ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत प्रश्न उपस्थित केला आहे. सोबतच राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांचे ट्विट :-

‘सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल राजीनामा द्यायला हवा. त्यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजप महिला शाखेच्या वतीने एका पत्रकाद्वारे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर, आता आम्ही देखील या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत.’

‘ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात त्या व्यक्तीला या पदांवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून त्यांचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे’,