सुशांतसिंह साठी वाढदिवस साजरा करणार नाही: शेखर सुमन

9

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता पाच महिने झाले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची खचून चौकशी सुरु आहे. अभिनेता आणि निवेदक म्हणून प्रसिध्द असलेल्या शेखर सुमन यांनी ट्विट केला आहे. ते ट्विट अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित आहे. शेखर सुमन यांचा 7 डिसेंबरला वाढदिवस आहे. मात्र यावर्षी ते वाढदिवस नेहमीप्रमाणे साजरा करणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत बोलताना त्यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा दाखला दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंह याने आत्महत्या केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेक सेलिब्रेटींना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. याप्रकणाचा तपास कुणाकडे द्यायचा यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु होती. दरम्यान या प्रकरणावर अभिनेते शेखर सुमन वारंवार प्रतिक्रिया देत होते. एक दिवस चमत्कार होईल अन् सुशांत प्रकरणातील सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

या प्रकरणाला अचानक ड्रग्स कनेक्शनचे वळण लागले. बॉलीवूडमधील ब-याच कलाकारांना चौकशीसाठी नार्कोने बोलावले होते. यामुळे सुशांतला पूर्णपणे न्याय मिळाला नाही असे शेखर सुमन यांचे मत आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, मी येत्या 7 डिसेंबर रोजी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. सुशांतसाठी तर मी एवढं नक्कीच करु शकतो. त्याच्याऐवजी मी देवाकडे अशी प्रार्थना करेल की, सुशांतच्या आत्महत्येला जे जबाबदार आहेत त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.