आयपीएल मध्ये आज बलाढ्य मुंबई इंडियन्स समोर हैद्राबाद संघाला योग्य नियोजन करून मैदानात उतरावे लागणार आहे. हैद्राबाद संघ सलग दोन पराभवानंतर मुंबई विरुद्ध जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादला सलग दोन पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स फॉर्मात आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्याच सामन्यात विजय मिळवत पुन्हा मुंबई इंडियन्सचे आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन अशी तगडी बॅटिंग लाईनअप मुंबईकडे आहे. मधल्या फळीत पोलार्ड, आणि हार्दिक पांड्या मुंबईला सामना जिंकून द्यायला सक्षम आहेत.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर दोन यष्टी रक्षकांना संघात स्थान देत असल्यानं नेमक्या कोणत्या उद्देशाने संघ मैदानात उतरत आहे. हे कळायला मार्ग नाही. जॉनी बेयरस्ट्रो आणि रिद्धीमान सहा यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात येतं मात्र, रुद्धीमान सहाला अजून साजेसा खेळ करता आलेला नाही.