अखेर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागणार? पालकमंत्र्यांचा ईशारा

17

मुंबईत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. रुग्णांसोबतच आता मृत्युच्या प्रमाणांमध्येसुद्धा वाढ होते आहे. मुंबई पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेवर आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात न आल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाच लागणार असा ईशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्येवरुन महापौर किशोरी पेंडणेकर यांनीसुद्धा अनेकदा मुंबईकरांना ईशारे दिले आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्यव्यवस्थेवर होतो आहे. अॉक्सीजनची कमतरता भासते आहे. अशावेळी आरोग्यव्यवस्था अधिक सुसज्ज करण्यासाठी तरी लॉकडाउन करावाच लागेल असे किशोरी पेंडणेकर म्हणाल्या होत्या.

मुख्यमंत्री लोकांना वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. मास्क लावा, सॅनीटायझरचा वापर करा, गर्दी टाळा मात्र मुंबईत या सगळ्या नियमांना धाब्यावर बसून कोरोना वगैरे काही नसल्याच्या परिस्थितीतच लोक वावरतायत, हे धोकादायक आहे.

आम्ही अजून काही काळ वाट बघू, बाजारात, गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांना नियमावली पाळण्याचे आवाहन करु. मात्र परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यास