जिल्हा परिषद शाळांमधील सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा यंदाही लटकल्या आहेत. या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदांबाबत राज्य सरकारकडून अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना परीक्षाविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून ऑफलाइन शाळा बंदच आहेत.
महाराष्ट्र दिनी (१ मे) परीक्षांचा निकाल जाहीर केला जातो. वार्षिक परीक्षांच्या पूर्व नियोजनाला गेल्या वर्षी पहिल्यांदाच खंड पडला होता. यंदा सलग दुसऱ्यांदा याची पुनरावृत्ती होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
परिणामी गेल्या वर्षी पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळांच्या परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यानंतरसुद्धा या परीक्षा घेता येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.